साईबाबा बँकला ‘बेस्ट को-ऑपरेटिव्ह इअर’ पुरस्कार

साईबाबा बँकला ‘बेस्ट को-ऑपरेटिव्ह इअर’ पुरस्कार

साईबाबा बँकला 'बेस्ट को-ऑपेरेटिव्ह इअर' या पुरस्कार

सेलू  : बँक टेक एक्स फॅक्टर यांच्यावतीने मुबंई येथे आयोजित एका विशेष समारंभात देशातील पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, स्मॉल फायनान्स बँक या बँकांसोबतच सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकला बेस्ट को-ऑपेरेटिव्ह इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे इंडिपेन्डेन्स डायरेक्टर दीपक शर्मा यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार सभासद, ग्राहक, संचालक मंडळ व कर्मचारीवृंद यांचा वाटा आहे. या पुरस्काामुळे राष्ट्रीयस्तरावर पुन्हा एकदा बँकेचा नावलौकिक वाढला आहे. आता कर्मचारी व बँकेचे संचालक यांची जवाबदारी वाढली आहे ग्राहक व सभासदांना अत्यंत सुरक्षित अत्याधुनिक सेवा सुविधा यांची अधिक जाणीव पूर्ण देण्यासाठी आम्ही कटी बद्ध आहोत. ग्राहकांसाठी विविध आधुनिक सेवा उपलब्ध आहेत. गेल्या 30वर्षा पासून सेवा देत आहोत. ग्राहकांनी, सभासद यांनी जास्तीत जास्त एटीएम, पीओएस, ई-कॉम, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड, अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करावा, असे आव्हान केले आहे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!