सेलू शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी रहीमखाँ पठाण

सेलू /परभणी : सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था तसेच यासेर उर्दू शाळेचे अध्यक्ष तथा सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक रहीमखाँ खैरूल्लाखाँ पठाण यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सेलू शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पठाण यांचा राजकीय अनुभव व दांडगा जनसंपर्क पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांच्या शिफारशीनुसार रहीमखाँ पठाण यांची सेलू शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पठाण हे तीन वेळा सेलू नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. या निवडीबद्दल रहीमखाँ पठाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे