शालेय जिल्हा क्रिकेट स्पर्धा : पूर्णा, सेलू, जिंतूर, परभणीचे वर्चस्व
सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या.
स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले-मुली गटात ३८ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. क्रीडा अधिकारी रोहन औढेंकर, डॉ.प्रवीण जोग, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू संदीप लहाने, गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले मानले.
स्पर्धेतील अंतिम निकाल : १९ वर्षे मुले : विलासराव देशमुख उर्दू मा.उच्च शाळा जिंतूर प्रथम, शांताबाई नखाते मा.उच्च मा.आश्रम शाळा, वालूर द्वितीय, १७ वर्ष मुले : पोदार इंटरनॅशनल धर्मापुरी, परभणी प्रथम, न्यू इरा सेकंडरी स्कूल जिंतूर द्वितीय, १४ वर्ष मुले : ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू प्रथम, विलासराव देशमुख उर्दू शाळा जिंतूर व्दितीय, खान अब्दूल गफार खान मानवत तृतीय, १९ वर्ष मुली : गुरुबुध्दी महाविद्यालय पूर्णा प्रथम, सामेश्वर मा. उच्च मा.धर्मापूरी परभणी व्दितीय, १७ वर्ष मुली : केजीबीव्ही पूर्णा प्रथम, जवाहर विद्यालय जिंतूर द्वितीय. पंच प्रमुख राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, चरणसिंग तंवर, राहुल घाडगे, जिशान सिद्दीकी, योगेश आदमे, शेख मोईन, अलीम पठाण, शेख नावेद,भारत झोडगे, आदित्य आडळकर, दीपक जोरगेवार, दीपक निवळकर, अक्षय खीळकर, गजानन शेलार यांनी सहभाग घेतला.