ज्ञानसाधना फार्मसी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय भितीपत्रक स्पर्धा

ज्ञानसाधना फार्मसी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय भितीपत्रक स्पर्धा

विजेत्यांना पारितोषिक वितरण; ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी अंतर्गत ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून जेनरिक औषधाबद्दल जागरूकता , रुग्ण समुपदेशन, अंमली पदार्थाचे सेवन कमी करणे, सध्याच्या चांगल्या उत्पादन पद्धतीची भूमिका, फार्मसीमध्ये उदयोन्मुख ट्रेंड इत्यादी विषयासंदर्भात राज्यस्तरीय भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के होते. यावेळी संस्थेच्या सचिव शितल सोनटक्के मॅडम होत्या . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पाटील एस.एस.(निलंगा), डॉ.नागोबा एस. एन.(लातूर), डॉ इंगोले आर.डी.(पाथरी), प्राचार्य डॉ.एम.डी. सलाउद्दीन व समन्वयक सूर्यवंशी डी.व्ही. यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. सुरसागर गीत संचाच्या स्वागत गीतानंतर व मान्यवरांच्या यथोचित स्वागत सत्करानंतर संस्थेच्या सचिव शितल सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २० पेक्षाजास्त महाविद्यालयाच्या पदविका व पदवी मिळून जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने पदविका महाविद्यालयांमध्ये अनुक्रमे पहिला क्रमांक दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, दुसरा क्रमांक चन्नाबसवेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, तर तिसरा क्रमांक ज्ञानसाधना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धर्मापुरी परभणी महाविद्यालयाने पटकावला. पदवी महाविद्यालयामध्ये पहिला क्रमांक एसव्हीपी कॉलेज हट्टा, दुसरा क्रमांक स्कूल ऑफ फार्मसी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, तर तिसरा क्रमांक इंदिरा गांधी कॉलेज ऑफ फार्मसी, नांदेड या महाविद्यालयाने पटकावला. परीक्षक म्हणून डॉ.राहुल गायकवाड व प्रा.रवी पिंपळे उपस्थित होते. विजयी विद्यार्थ्यांचे रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.आर.ए.मस्के व प्रा.एम.ई.पवार यांनी केले.प्राचार्य डॉ.एम.डी.सलाउद्दीन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी समन्वयक एन.व्ही. क्षीरसागर, पी.एन.काळे, सूर्यवंशी डी.व्ही , विभागप्रमुख नजन ए.ए., श्री पवार पी.बी, पडोळे जे.आर., दुधाटे जी.एस., प्राध्यापक तथा प्राध्यापकेतर कर्मचारी व फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!