पांगरीच्या शाळेची व्यवस्थापन समिती बिनविरोध 

पांगरीच्या शाळेची व्यवस्थापन समिती बिनविरोध 

अध्यक्षपदी प्रा.दामोधर बुधवंत, राजाभाऊ जहाने उपाध्यक्ष

पांगरीच्या शाळेची व्यवस्थापन समिती बिनविरोध 

जिंतूर : पांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीची शनिवारी, ०५ ऑक्टोंबर रोजी आयोजित पालक सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा.दामोधर बुधवंत यांची, तर उपाध्यक्षपदी राजाभाऊ जहाने यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे शाळेच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.या पालकसभेत पालक, शिक्षक व इतर पदाधिकारी यांचा सहभाग उत्साहवर्धक होता. शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी ही समिती महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक तथा समितीचे सचिव के.सी.घुगे यांनी व्यक्त केले. निवड प्रक्रियेत सर्व सदस्यांनी सहकार्य दिल्याबद्दल नवनिर्वाचित समितीने आभार मानले. समितीने शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सुविधा पुरवण्याचा आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!