उत्कृष्ट शिक्षक माधव गव्हाणे यांचा सत्कार
सेलू : तालुक्यातील रायपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे यांना जिल्हा परिषद परभणीच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडची पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल डॉ.सुरेश हिवाळे आणि मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शनिवारी रामराव बोबडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामराव गायकवाड होते. कार्यक्रमास डॉ.राजाराम झोडगे, सुभाष मोहकरे, पांडुरंग मुसळे, तुकाराम मगर, राजेंद्र होलसूरे, संजयकुमार इंगळे, प्रा. अनंत मोगल, संभाजी रोडगे, सच्चिदानंद डाखोरे, शाम मचाले, नानासाहेब पवार,लखन उगिले, बालाजी केंद्रे,आत्माराम हारकळ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. आभार रामराव बोबडे यांनी मानले.