नवरात्रोत्सवानिमित्त १२१ कुमारिकांचे सेलूमध्ये पूजन
सेलू : सेलू शहरातील श्रीपरशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त १२१ कुमारिकांचा पूजन कार्यक्रम श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज मंदिराच्या मंगल कार्यालयात मोठ्या भक्तीमय वातावरणात झाला. श्रीजगदंबा माता, श्रीभगवान परशुराम, ग्रामदैवत श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. १२१ कुमारीकांचे पुरोहितांच्या मंत्रघोषात विधीवत पूजन करून प्रत्येक कुमारिकेला समितीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आगळ्या वेगळ्या धार्मिक कार्यक्रमासाठी कुमारिका, महिला, माता भगिनी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.