स्व.कल्पना दीक्षित शुद्ध जलप्रकल्पाचे लोकार्पण

स्व.कल्पना दीक्षित शुद्ध जलप्रकल्पाचे लोकार्पण

सेलूतील नूतन कन्या प्रशालेत कार्यक्रम

सेलू : सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेत उभारण्यात आलेल्या स्व.कल्पना दीक्षित-कोठेकर शुद्ध जलप्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी (५ ऑक्टोबर) करण्यात आले. स्व.कल्पना ह्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या स्मृतीत कोठेकर परिवाराच्या अर्थिक योगदानातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. कल्पनाचे पती नितिन व मुलगी उत्कर्षा यांच्या हस्ते कोनशीलेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, अभियंता नितिन दिक्षित, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर, अमृत कोठेकर, उत्कर्षा दीक्षित, माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,अजिजखॉं पठाण, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, दत्तराव पावडे, मल्हारीकांत कोठेकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी माजी प्राचार्य कुलकर्णी, अभियंता नितिन दिक्षित, संजय पिंपळगांवकर, जयप्रकाशजी बिहाणी, डॉ.लोया यांनी भावना व्यक्त केल्या. प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे यांनी जलगीतांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत, तर  मुख्याध्यापिका निशा पाटील यांनी आभार केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!