प्रा.डॉ.वीरा राठोड यांची महाराष्ट्र राज्य बंजारा साहित्य अकादमीवर नियुक्ती
परभणी : परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रा.डॉ.वीरा राठोड यांची नुकतीच राज्य सरकारने स्थापन केलेल्या बंजारा साहित्य अकादमीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे . बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकसाहित्य आदीच्या प्रसार, प्रचार, विकास आणि प्रोत्साहन आदी करिता गोरबंजारा साहित्य अकादमी कार्य करेल. राठोड यांची ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असेल. वीरा राठोड यांनी यापूर्वी राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समिती आणि इतरही समित्यावर कार्य केलेले आहे. वीरा राठोड यांचे आजवर पाच ग्रंथ प्रकाशित असून त्यांना भारतीय साहित्य अकादमी दिल्लीचा राष्ट्रीय स्तरावरील साहित्य अकादमी युवा पुरस्काराबरोबरच अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. विविध विद्यापीठे आणि शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेशही करण्यात आलेला आहे. हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली आदी भाषांमध्ये वीरा राठोड यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील सामाजिक व साहित्य वर्तुळातून प्रा.राठोड यांचे अभिनंदन होत आहे