जिल्ह्यातील १२ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील १२ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

सेलू तालुक्यातून रायपूर शाळेतील माधव गव्हाणे, तर जिंतूरमध्ये दिनकर चौधरी यांना पुरस्कार

परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या जिल्हा शिक्षक निवडीच्या प्रस्तावास विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळाली असून, प्राथमिक ९, तर माध्यमिकच्या ३ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील पोलास यांनी ही माहिती दिली.

दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मात्र, यंदा हा प्रस्ताव वेळेत मंजूर झाला नसल्याने ही प्रक्रिया पार पडली नाही. २३ सप्टेंबरला जिल्हा शिक्षक पुरस्काराची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर करण्यात आली. प्राथमिक गटात गंगाखेड तालुक्यातील गुजेगाव शाळेतील मुख्याध्यापक व्यंकट ढेले, जिंतूर तालुक्यातील निवळी खु, शाळेतील मुख्याध्यापक दिनकर चौधरी, परभणी तालुक्यातील तट्‌टूजवळा येथील शिक्षक रामेश्वर कदम, पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण शाळेतील कालिदास राऊत, पालम तालुक्यातील डिग्रस शाळेतील सिद्धार्थ खंदारे, पूर्णा तालुक्यातील कमलापूर शाळेतील संतोष रत्नपारखे, मानवत तालुक्यातील रुढी शाळेतील उमाकांत हाडुळे, सेलू तालुक्यातील रायपूर शाळेतील माधव गव्हाणे, सोनपेठ तालुक्यातील खरपी तांडा शाळेतील शशिकांत बिराजदार यांचा समावेश आहे. माध्यमिक शिक्षकांमधून पाथरी तालुक्यातील वाघाळा शाळेतील शिक्षिका सुनयना चव्हाण, पालम तालुक्यात पेठशिवणी शाळेतील शिक्षक अवधूत इगवे, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव शाळेतील शिक्षक विनोद करखेलीकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी सुनील पोलास म्हणाले, २०२४ मधील शिक्षकांचे जिल्हा निवड समितीने पाठविलेले प्रस्ताव मंजूर झाले आहेत. लवकरच या शिक्षकांना हे पुरस्कार वितरित करण्याचे नियोजन केले जाईल.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!