क्रीडास्पर्धेतून जीवनमूल्ये विकसित होतात :पोलीस निरीक्षक दीपक बोरसे

क्रीडास्पर्धेतून जीवनमूल्ये विकसित होतात :पोलीस निरीक्षक दीपक बोरसे

जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेला सेलूमध्ये प्रतिसाद

सेलू : खेळ हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून खेळामधून जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, यश, अपयश, टिका, कौतुक, बलोपासना, आरोग्य ही जीवनमूल्ये विद्यार्थांच्या अंगी विकसित होतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मैदानावर खेळवण्यासाठी पाठवावे,असे प्रतिपादन सेलू पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व एल के आर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवार दिनांक ४ आक्टोबर रोजी आयोजित जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाधिकारी राहूल औंढेकर,आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक रासकटला, प्रा.नागेश कान्हेकर, हुलगिरे, सय्यद सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर प्रा.नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. सामनाधिकारी म्हणून संजय भूमकर, राजेश राठोड, राहुल घांडगे, झिष्यंन्त सिद्दिकी, सूरज शिंदे, योगेश आदने, भरत घांडगे, रामा गायकवाड, प्रा.रवी दवे, कैलास टेहरे, ठाकूर, अमर सुरवसे, आदित्य आडळकर आदींनी परीश्रम घेतले. जिल्हाभरातून १७ वर्षे वयोगटातील १४ संघांनी सहभाग नोंदवला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!