तलवारबाजी स्पर्धेत ‘एआरटीएम’ चे वर्चस्व

तलवारबाजी स्पर्धेत ‘एआरटीएम’ चे वर्चस्व

सेनगाव : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत ए.आर.टी.एम.इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. विजयी संघामध्ये १४ वर्षे आतील मुले कौशल व्यास, कृष्णा रोहडकर, सोमनाथ दुकानदार, अभिश्रुत काळे, सुफी शेख,उत्कर्ष सोमाणी,अर्णव शिंदे, युवराज ढवळे, हर्षवर्धन देशमुख,वैभव जांगीड, अर्जुन चव्हाण यांनी यशस्वी कामगिरी केली. तर १४ वर्ष मुली अविरा भवर, निधी संघई, श्रावस्ती कांबळे, वेदांती सीताफळे, अनुराधा खंदारे, गौरी मुंदडा यांनी यशस्वी कामगिरी बजावली. तसेच १७ वर्षे मुले रुद्राक्ष वामन,योगेश दळवी,१ ७ वर्षे मुलीमध्ये सलोनी रहाटे या खेळाडूंनी विजय मिळवून संस्थेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोविला. खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक श्री.शिंदे व संघ व्यवस्थापक रोहिता व्यास यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष ब्रिजगोपालजी तोष्णीवाल, संचालक पंकजजी तोष्णीवाल, प्राचार्य आर.व्ही.सुनीलकुमार तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!