नवरात्रोत्सव : श्रीजगदंबा माता दर्शनयात्रेला सेलूमध्ये सुरुवात

नवरात्रोत्सव : श्रीजगदंबा माता दर्शनयात्रेला सेलूमध्ये सुरुवात

विनोद बोराडे मित्रमंडळाने अकराव्या वर्षीही जपली परंपरा

सेलू/परभणी : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सेलू येथील विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने सेलू शहरातील महिला भगिनींसाठी राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत, मंठा येथील सिद्धपीठ श्री जगदंबामाता दर्शनयात्रेला सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या दर्शनयात्रेचे यंदा ११ वे वर्ष आहे. महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिर परिसरात सोमवारी सकाळी भागवताचार्य नंदकिशोर पुराणिक महाराज आणि आयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते वाहनांची विधीवत पूजा करून यात्रेचा शुभारंभ झाला. राजेंद्र पवार, व्यंकटराव चव्हाण, संतोष बेंडे, बालासाहेब सरकाळे, साईराज बोराडे, गौतम धापसे, सुनील घेवारे, अरूण दौड, अमर सुरवसे, प्रतीक बोराडे, अशोक मुसळे, संतोषगुरू आदींसह मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

चार दिवसांच्या दर्शनयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरू महिलांसाठी साईबाबा मंदिर परिसरात आणि मंठा येथील मित्रमंडळाच्या वाहनस्थळी प्रतीक्षालयाची तसेच चहापान, पिण्याच्या पाण्याची व लहान मुलांसाठी खाऊची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज २५ क्रुझर व दोन स्कूल व्हॅनद्वारे सात ते आठ महिलांच्या दर्शनयात्रेचे नियोजन आहे. महिलांना घरपोच सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यात्रेदरम्यान महिलांच्या सुरक्षिततेकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात असल्याचे आयोजक तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सांगितले. उपक्रमासाठी मित्रमंडळाचे समन्वयक राजेंद्र पवार तसेच साईराज बोराडे मित्रमंडळ, विविध समित्यांचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!