५३ विद्यार्थ्यिनींना सायकलचे वाटप
भारतीय स्टेट बँकेचा परभणीमध्ये उपक्रम
परभणी : सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या परभणी येथील प्रादेशिक व्यवसाय कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी (५ ऑक्टोबर) जिल्हा परिषद कन्या हायस्कूलच्या ५३ गरजू विद्यार्थ्यिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सरव्यवस्थापक अनिरुद्धकुमार चौधरी, प्रियाकुमार सरिगाला, सम्राट पुरकायस्थ, शिक्षणाधिकारी आशा गरुड, निळकंठ पाचंगे, ओमप्रकाश यादव, तुळशीदास गरुड आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यात सातत्यपूर्ण चालणार्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेणारे व्यवस्थापक श्री हट्टेकर यांच्या प्रयत्नांचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.काळे व चौधरी यांनी कौतुक केले. जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक उदय कुलकर्णी, विनीत पाटील, साईनाथ खानसोले, कल्याण शिंदे, सुधीर सोनुनकर आदींची उपस्थिती होती.