मंठा देवी दर्शनासाठी मोफत बससेवा

मंठा देवी दर्शनासाठी मोफत बससेवा

डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा उपक्रम

सेलू/परभणी : श्रीराम प्रतिष्ठानच्या ‘आई’ महोत्सवा अंतर्गत डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाच्या वतीने रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील महिला भगिनींना मंठा येथील श्रीरेणुकामातेचा दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी यावर्षीही मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी डिग्रस (बरसाले) येथून सेवेचा शुभारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे-पारवे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने महिलांचा भगिनींचा साडी व रेणुकामातेचा फोटो भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाश गजमल, संजय गटकळ, दत्ताराव लाटे, श्री. विश्वनाथ गजमल, आबासाहेब तारडे, बद्री बरसाले, योगेश बरसाले, ज्ञानेश्वर बरसाले आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले. श्याम शेळके यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!