देऊळगाव गात ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व
सरपंचपदी लक्ष्मीबाई कदम यांची बिनविरोध निवड
सेलू/परभणी : सेलू तालुक्यातील देऊळगाव गात ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्ष गटाच्या लक्ष्मीबाई दत्ताराव कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील आणखी एका मोठ्या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाच्या गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मीनाताई गोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे फेरनिवड करण्यासाठी सोमवारी (७ ऑक्टोबर) रोजी निवडूणक प्रक्रियेसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी ए.एन.माटकर होते. एकूण अकरा सदस्यांपैकी अक्षय कदम, शांता सोनटक्के, लक्ष्मीबाई कदम, शिवाजी कदम, शारदा हातकडके, शालन कदम, भाग्यश्री दत्ता कदम, गणपती काळे, लक्ष्मीबाई तांबे आदी सदस्य सभेला उपस्थित होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत सरपंचपदासाठी लक्ष्मीबाई कदम यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे लक्ष्मीबाई कदम यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ए.एन.गात यांनी काम पाहिले. दरम्यान, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तराव कदम यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. नवनिर्वाचित सरंपच तसेच सदस्यांचा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी माजी उपसरपंच विशूतात्या कदम, शिवाजीराव कदम, त्रंबकअपा कदम, माजी जिप सदस्य शिवाजी कदम, दत्ताआबा कदम, संतोष सोनटक्के, दत्ता तांबे, गोरख मगर, विश्वनाथ मांडाखळीकर, बालासाहेब संत, बालासाहेब कदम, रोहिदास गायकवाड, माऊली कदम, सचिन कदम, ऋषी कदम, किरण कदम, अमर कदम, कृष्णा कदम, वैभव कदम आदींची उपस्थिती होती.