श्रीरेणुकामाता दर्शनसेवा : डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम : आमदार मेघना बोर्डीकर
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या आई महोत्सवानिमित्त डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाच्या वतीने रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील महिला भगिनींना मंठा येथील श्री रेणुकामातेचा दर्शनाचा लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी घोडके पिंपरी, डिग्रसवाडी, देवला पुनर्वसन, वाघ पिपरी, शिराळा, शिंदे टाकळी येथील माता भगिनींनी श्री रेणुकामाता देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी बोलतांना आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. याप्रसंगी सेलू- जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रकाश गजमल, संजय गटकळ, दत्ताराव लाटे, विश्वनाथ गजमल, आबासाहेब तारडे, बद्री बरसाले, योगेश बरसाले, ज्ञानेश्वर बरसाले, राम घोडके, जगदीश घोडके, विश्वनाथ घोडके, विष्णू आठवले, हरिभाऊ बरसाले, सिद्धीक पठाण, राहुल गाडेकर, अर्जुन बुरे, रामचंद्र बरसाले, अनिल बरसाले, विठ्ठल फासाटे, बद्रीनाथ बरसाले, वाघ पिपरी येथील आबासाहेब वाघ, अजय वाघ, संजय वाघ, शाम वाघ, शिराळा येथील उद्धव खेडेकर, वसंत खेडेकर, कुंडलिक खेडेकर, बाबासाहेब खेडेकर, जनार्दन वायगुंडे, कल्याणराव खेडेकर, शिंदे टाकळी येथील महिला सरपंच अश्विनी कैलास पवार, नाथा पवार, कैलास पवार, सागर पवार, आत्माराम पवार, बाळासाहेब बोंबले, अंकुशराव पवार, प्रकाश राठोड, बाबासाहेब पवार, महादेव गजमल, दिगंबर पवार, सुदामाती पवार, कार्तिक पवार, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, शिराळा व शिंदे टाकळी येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी सेलू जिंतूर मतदार संघातील झालेल्या विकास कामांचा तसेच सध्या मंजूर करून आलेल्या विकास कामांची माहिती आमदार बोर्डीकर यांनी दिली. यावेळी महिला माता भगिनींना साडी वाटप तसेच फराळाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले. आभार रत्नपारखे यांनी मानले.