ज्ञानसाधना नागरी सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ
परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या ज्ञानसाधना नागरी सहकारी पतसंस्थेचे शुभारंभ, १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर झाला. अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व्यंकटेश कुरुंदकर होते, तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवसांभ दादा होते. याप्रसंगी उद्योजक गोविंद अजमेरा, महेंद्र मोताफळे, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, उपाध्यक्षा प्रा.शितल सोनटक्के, अशोकआप्पा धुळे, श्री सोळंके, श्री कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शिवसांभ सोनटक्के, कुरूंदकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांच्या बचत बँकेपासून ते पतसंस्था स्थापन करण्यापर्यंतचा प्रवास सांगतांना या पतसंस्थेची वाटचाल प्रामाणिकपणाने सुरू राहील, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.शितल सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पी.व्ही.कदम यांनी केले. शाखा व्यवस्थापक अशोक डुकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक एस.आर.रोडे, नागेश वांगकर, अर्जुन कने, कल्याण सिराळ, त्रिंबक राऊत, रामचंद्र गायकवाड , रवि देशमुख भोगावकर, संपत गवते संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.