देऊळगाव गात येथे विविध विकासकामांचे उद्घाटन
सेलू : सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे ४० लक्ष रुपयांच्या सी.सी.रोड व १० लक्ष रुपये खर्चाच्या नाली बांधकाम कामाचे उद्घाटन आमदार मेघना यांच्या आई मीनाताई बोर्डीकर आणि माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते पार पडले. उदघाटन प्रसंगी शिवसेना तालुकाध्यक्ष बाबाराव काटकर, भाजपा तालुकाध्य दत्ताराव कदम, मार्केट कमिटी संचालक अजय डासाळकर, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, हनुमान भाऊ गात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उदघाट्न सोहळ्यास देऊळगाव गात येथील नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मीबाई दत्ताआबा कदम व माजी सरपंच मीनाताई गोरे तसेच शिवाजी जिजा कदम, चंदू पाटील कदम, संतोष सोनटक्के, शिवाजी कदम, गणेश काळे, दत्ता तांबे, रवींद्र गोरे, दत्ता आबा कदम, त्र्यंबक आप्पा कदम, बंडू नाना कदम, विष्णू तात्या कदम, माऊली कदम, गोरखभाऊ शिलार, महालिंग कवले, पाचलेगावकर, दादासाहेब बारहाते, सचिन कदम, चैतन्य कदम, विठ्ठल आवटे, सखाराम कदम, विश्वनाथ मांडाखळीकर, हनुमान कदम, सर्जेराव आवटे, आप्पा शिलार, मोकुतात्या शिलार, पांडुरंग जाधव, आसाराम जाधव, गोरख कदम, नाना कदम, गोरख महाराज पवार, विश्वनाथ मामा गायकवाड, पांडुरंग जिजा कदम, दत्ताभाऊ कणसे, उद्धव आवटे, बाळू काका पाचलेगांवकर, रोहिदास गायकवाड, मोहन शिलार उपस्थित होते.