स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सेलूत स्वागत

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सेलूत स्वागत

आजपासून श्रीरामकथा, सकाळी शोभायात्रा

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे सेलूत स्वागत

सेलू/परभणी : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून मंगळवारपासून (१५ ऑक्टोबर) श्रीराम कथेला प्रारंभ होत आहे. सोमवारी, १४ ऑक्टोबररोजी रात्री दहाच्या सुमारास स्वामीजींचे आयोजक जयप्रकाश विजयकुमार बिहाणी यांच्या निवासस्थानी आगमन झाले. बिहाणी परिवाराच्या वतीने स्वामीजींचे पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.

सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या कथास्थळ ‘हनुमानगढ’ परिसरात बुधवार, २३ ऑक्टोबरपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वामीजी श्रीराम कथा मराठीतून सांगणार आहेत. यानिमित्ताने सेलू शहरात जागोजागी कथेच्या बॅनर, होर्डींंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून कथेसाठी अवघी सेलूनगरी सज्ज झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत श्रीरामायणासह विविध ग्रंथ दिंडी, बँड पथक, लेझीम पथक, श्रीराम उत्सव मूर्ती, भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू सहभागी होणार आहेत. तसेच विविध सजीव देखावे शाळांचे विद्यार्थी सादर करणार आहेत. शोभायात्रा व कथाश्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!