डॉ.संजय रोडगे यांचा मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मान
नाशिक येथील मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीने गौरव
सेलू/परभणी : नाशिक येथील मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ.संजय रोडगे यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल डॉ.रोडगे यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. मराठवाड्यातील पहिली ज्ञानतीर्थ विद्यालय ही मराठी माध्यमाची डिजिटल शाळा सुरू करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल या इंग्रजी शाळेचा ठसा उमटविणे, सेलू तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना अपूर्वा पॉलिटेक्निकच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाचे दालन, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र पदवी आणि पदविकाचेही शिक्षण सुरू केले. कोविड काळामध्ये संस्थेमध्ये शरदचंद्रजी पवार कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना आरोग्य सेवा आदी विविध कार्याची दखल घेऊन डॉ.रोडगे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला. याबद्दल विविध स्तरांतून डॉ.रोडगे यांचे अभिनंदन होत आहे.