दम्याच्या २७० रूग्णांना मोफत औषधी वाटप

दम्याच्या २७० रूग्णांना मोफत औषधी वाटप

सेलूतील श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेचा उपक्रम

सेलू/परभणी : सेलू येथील श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळा, श्रीरामजी भांगडीया रूग्ण सेवा मंडळ आणि विजय मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दम्याच्या २७० रूग्णांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. प्रतिवर्षा प्रमाणे दादू पंथी मठ गोशाळेच्या वतीने दम्याच्या रुग्णांना मोफत औषधी वाटप केले जाते. याही वर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. गाईचे दुध, बैद्यनाथची औषधी, मुळ्याची भाजी, मातीचे पात्र आदी प्राप्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, माजलगाव, पाथरी, परतूर, मंठा, जिंतूर व सेलू परिसरातील येथील रूग्णही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान महाराज बोरूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनारायण मालाणी, सुरेंद्र तोष्णीवाल, राजेंद्र करवा, जगन्नाथ पवार, सूर्यकांत जाधव, बबलू दायमा, कृष्णा काटे, पापाजी काबरा, गोविंद शेलार, गणेश भागडे, अशोक शेलार, श्रीनिवास टाक, गोविंद गाढवे, रामा शेलार,भगवान पावडे, आनंद सोनी, दिपक पवार, आदींनी परीश्रम घेतले.

गोळ्या बंद झाल्या

आम्ही मागील दोन वर्षापासून कोजागिरी पौर्णिमेला येथील गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेतील औषधी घेतो.आम्हाला दम्याचा खूप त्रास होत, असे परंतु येथील औषधी सेवन केल्यामुळे आमचा दम्याचा त्रास कमी झाला असून नियमितपणे घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या देखील बंद झाल्या, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी नगर येथील जया जनार्दन कोल्हे, प्रिया गोकुळ सूर्यवंशी, मंगल कुलकर्णी, अमित कुलकर्णी (सेलू), सुधाकर बाबाराव लिपणे, लक्ष्मण माने अंबादास जाधव, इंदुमती भास्करराव कुलकर्णी (गंगामसला) यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!