आंतरभारतीच्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूमध्ये गौरव
सेलूतील नूतन कन्या प्रशालेचे वर्चस्व
सेलू/परभणी : आंतरभारतीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी राष्ट्रीय व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धा अंतर्गत परभणी जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांचा बुधवारी, १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. सेलू (जि.परभणी) येथील आंतरभारती शाखेच्या वतीने परभणी जिल्हास्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण प्रसंगी आंतरभारती सेलूचे अध्यक्ष महादेव आगजाळ, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे सहसचिव तथा गझलकार संजय विटेकर, बाबासाहेब हेलसकर, सर्जेराव लहाने, विलास शिंदे, पंडित जगाडे संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर, आंतरभारती सेलूच्या सचिव कीर्ती राऊत यांची उपस्थिती होती.
या वेळी प्रथम क्रमांकप्राप्त समीक्षा दिनकर कुलकर्णी, द्वितीय अक्षरा गजानन पवार, तृतीय लावण्या दीपक शेरे(नूतन कन्या प्रशाला सेलू)
तृतीय शिवानी कळसाईतकर (जिपप्राशा, राणी वाहेगाव) या विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना संजय विटेकर म्हणाले की. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी विविध प्रकाराच्या स्पर्धेत व्हावे. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. कल्पना हेलसकर यांनी आभार मानले.