सेलू बाजार समिती कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

सेलू बाजार समिती कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

जिल्हा निंबधकांना निवेदन, उपोषणाचा इशारा

सेलू/परभणी : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून थकले आहे. थकीत वेतन तत्काळ अदा करावे, अशी मागणी गुरुवारी (१७ ऑक्टोबर) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.‌
सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी प्रकाश राठोड यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की; सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे माहे मे ते ऑक्टोबर २०२४ या सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. कर्मचाऱ्यांनी बाजार समितीचे सचिव यांच्याकडे मागील पाच महिन्यांपासून वेतन अदा करण्याबाबत वारंवार मागणी केली. पाठपुरावा केला. परंतु, अद्यापही वेतन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे; तसेच बँकेचे हप्ते थकल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. दिवाळीचा सण काही दिवसांवर आल्याने थकीत वेतन तत्काळ अदा करावे; अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर बाजार समितीचे सहायक सचिव डी.एम.शिंगणे, एन.सी.आजबे, व्ही.व्ही.हिंगे, ए.आर.राउत, ए.एम.बेले, एस. एस. गायकवाड, बी.एम.गायकवाड, एस.एन.देशमुख, ए.एस.वाटोडे, एस.पी.चौहान, एस.डी.खंडागळे, जी.डी.शिंदे, स्वप्नीता रेद्देवार, आर.डी.गोरे, डी.आर.ताठे, आर.पी.घोगरे, आर.टी.कवडे, डी.के.सपकाळ, शेख सितारा, व्ही.एम.मोरे, के.पी.गंलाडे आदींसह कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!