इंद्रायणी देवी : यात्रेनिमित्त ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे भव्य आयोजन

इंद्रायणी देवी : यात्रेनिमित्त ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे भव्य आयोजन

परभणी: तालुक्यातील मांडाखळी येथील इंद्रायणी देवी माळावर देवराई या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे प्रा. किरण सोनटक्के मित्र मंडळ व ज्ञानसाधना प्रतिष्ठान च्या वतीने इंद्रायणी देवी यात्रेनिमित्त महाप्रसाद चहा व मिनरल वॉटरचे भव्य आयोजन केले होते. मागील 22 वर्षापासून चालू असलेले महाप्रसादाचे आयोजन यावर्षी देखील इंद्रायणी देवी नवरात्र महोत्सव सातवी माळ व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त करण्यात आले होते.
याही वर्षी देवीच्या दर्शनास व इंद्रायणी देवी माळास देवराई मार्ग प्रदक्षिणा करण्यासाठी दि.10ऑक्टोबर- 2024रोजी सातव्या माळीस व दि. 16 व 17ऑक्टोबर-2024 रोजी कोजागिरी पौर्णिमे निमित्त लाखोच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांसाठी प्रा. किरण सोनटक्के मित्र मंडळ व ज्ञानसाधना प्रतिष्ठान यांच्यावतीने महाप्रसाद चहा व मिनरल वॉटर चे भव्य आयोजन करून महाप्रसाद देण्यात आला.

याप्रसंगी मांडाखळी पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण परभणी जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने भाविक भक्त इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आले होते. मागील 22 वर्षापासून ही महाप्रसाद, चहा, मिनरल वॉटर वाटपाची परंपरा अखंडपणे अविरत सुरूच आहे. इंद्रायणी देवीवरील असलेल्या भक्तीने आलेल्या भाविकांची सेवा केली जाते.सामाजिक व धार्मिकतेच्या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकी वृद्धिगत करणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रा. श्री किरण सोनटक्के सर यांनी मागील 22 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे.

इंद्रायणी देवीच्या नवरात्र महोत्सवास सातव्या माळीनिमित्त व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तीन दिवशीय यात्रेस जवळपास एक लाखांच्यावर भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा मनसोक्त आनंद घेतला. महाप्रसाद स्थळी पंचक्रोशीतील भाविक भक्त महाप्रसादाच्या सेवेसाठी येतात व आपली सेवा नोंदवतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद सेवेसाठी आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी महाप्रसादस्थळी भेट दिली व भाविक भक्तांसाठी एक तास महाप्रसाद वाटून सेवा केली. तसेच अनेक भक्तांनी महाप्रसाद वाटून सेवा दिली. यावेळी वरील तीनही दिवशी भाविक भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी महाप्रसादाच्या माध्यमातून 60 क्विंटल तांदूळ महाप्रसादासाठी उपयोगात आणले गेले तर सर्व भाविक भक्तांसाठी ३० हजार लिटर मिनरल वॉटर व चहाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसाद कार्यक्रमास पूर्णवेळ सेवेसाठी उपस्थित ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.प्रा.किरण सोनटक्के , बोर्ड मेंबर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तथा सिनेट सदस्य- स्वा रा. विद्यापीठ नांदेड,  शितल किरण सोनटक्के, सरपंच नागेश शिराळ, उपसरपंच शेख मोहसीन,ग्रामपंचायत सदस्य रामकिसन शिराळ, बाबुराव गायकवाड, पंढरी गायकवाड, बंटी पांचाळ,तसेच शिवराज सोनटक्के, अर्जुन कने, अशोक पंढरी शिराळ, जगन्नाथ सिराळ, अशोक राऊत,बबन सिराळ,प्रल्हाद आप्पा राऊत, शेख आयुब, नंदकुमार सोनटक्के, अशोकराव लोहट, आसाराम लोहट, रंजीत लोहट, अशोक सिराळ, बाळासाहेब राऊत, गंगाधर सिराळ, प्रल्हाद राऊत, त्र्यंबक राऊत, कल्याण शिराळ, महादेव राऊत, किशन कने, डॉ. मधुकर राऊत,विठ्ठल डोळसे,शिवशंकर डोळसे,माऊली सिराळ, सचिन सिराळ,तुकाराम सिराळ, नवनाथ सिराळ,कृष्णा रोडगे, दत्तराव काटाळ, बब्बर सिराळ, माऊली साबळे, अर्जून सिराळ, संतोष काटाळ, नितीन सिराळ,हबीब पठाण, शेख यकिन,अरेफ पठाण, भैय्या सिराळ, गोविंद सिराळ, माधव सिराळ, गोपाळ काने, विठ्ठल राऊत, तुकाराम सिराळ, सतीश कळसाईतकर, माणिक कणे, केशव सिराळ, गौरव सिराळ, नारायण सिराळ, मच्छिंद्र जोध, अशोक सिराळ, काशिनाथ जोध, गंगाराम डोळसे इत्यादी ग्रामस्थ मंडळी व प्रा. किरण सोनटक्के मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष बंटी (कृष्णा) जोध, उपाध्यक्ष-पांडू (अजय) सिराळ व गजानन लोहट, सचिव- सोपान लोहट व कृष्णा (गोटू) रोडगे, महादेव कने, सावता राऊत, गोविंद सिराळ, गोविंद कने, भैय्या (दीपक) सिराळ, बळीराम सिराळा, कोंडीबा ढाले,एजाज पठाण,माधव सिराळ,गौतम काळे, बाबासाहेब लाटे, किशन कने , तुषार लोहट, प्रवीण सोनटक्के,नितीन सिराळ ,योगेश जोध, अमोल गायकवाड, विजय काने , प्रवीण काळे, सिद्धेश्वर सिराळ, संदेश गायकवाड, कैलास काळे, नरहरी सिराळ, भागवत सिराळ ,अर्जुन लोहट, सलीम पठाण ,एकनाथ जोध, सायस काळे,प्रवीण काळे, गोविंद सिराळ , शेख अहमद शेख अली, गौतम काळे, शेख इन्ते पाशाभाई , नरहरी राऊत,गोविंद काळे ,कारभारी (देवजी) कणे,विनायक सिराळ व दीपक गायकवाड,अनिकेत गायकवाड, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे कर्मचारी, पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या महाप्रसाद कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदवून सेवा केली. प्रा. किरण सोनटक्के मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी जोध पाटील व उपाध्यक्ष अजय सिराळ ,गजानन लोहट आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!