आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची जिंतूरमधून उमेदवारी जाहीर

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची जिंतूरमधून उमेदवारी जाहीर

सेलू, जिंतूरध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

परभणी : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी पहिली उमेदवार यादी रविवारी, २० ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. पहिल्याच यादीत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिंतूर तसेच सेलू शहरासह तालुक्यात समर्थकांनी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला आहे.

सेलू व जिंतूर शहरातील मुख्य चौकामध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे अशी : नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस, कामठी -चंद्रशेखर बावनकुळे, शहादा – राजेश पाडवी, नंदूरबार- विजयकुमार गावीत, धुळे शहर -अनुप अग्रवाल, सिंदखेडा – जयकुमार रावल, शिरपूर – काशीराम पावरा, रावेर – अमोल जावळे, भुसावळ – संजय सावकारे, जळगाव शहर – सुरेश भोळे, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, जामनेर -गिरीश महाजन, चिखली -श्वेता महाले, खामगाव – आकाश फुंडकर, जळगाव (जामोद) – संजय कुटे, अकोला पूर्व – रणधीर सावरकर, धामगाव रेल्वे – प्रताप अडसद, अचलपूर – प्रवीण तायडे, देवली – राजेश बकाने, हिंगणघाट – समीर कुणावार, वर्धा – पंकज भोयर, हिंगना – समीर मेघे, नागपूर दक्षिण – मोहन माते, नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, तिरोरा – विजय रहांगडाले, गोंदिया – विनोद अग्रवाल, अमगांव – संजय पुरम, आर्मोली – कृष्णा गजबे, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चिमूर – बंटी भांगडिया, वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, रालेगाव – अशोक उडके, यवतमाळ – मदन येरवर, किनवट – भीमराव केराम, भोकर – श्रीजया चव्हाण, नायगाव – राजेश पवार, मुखेड – तुषार राठोड, हिंगोली – तानाजी मुटकुळे, जिंतूर – मेघना बोर्डीकर, परतूर – बबनराव लोणीकर, बदनापूर -नारायण कुचे, भोकरदन -संतोष दानवे, फुलंब्री – अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, गंगापूर – प्रशांत बंब, बगलान – दिलीप बोरसे, चंदवड – राहुल अहेर, नाशिक पूर्व – राहुल ढिकाले, नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे, नालासोपारा – राजन नाईक, भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, मुरबाड – किसन कथोरे, कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड, डोंबिवली – रवींद्र चव्हाण, ठाणे – संजय केळकर, ऐरोली – गणेश नाईक, बेलापूर – मंदा म्हात्रे, दहिसर – मनीषा चौधरी, मुलुंड – मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, चारकोप – योगेश सागर, मालाड पश्चिम – विनोद शेलार, गोरेगाव – विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम – अमित साटम, विले पार्ले – पराग अलवणी, घाटकोपर पश्चिम – राम कदम, वांद्रे, पश्चिम – आशिष शेलार, सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन, वडाळा – कालिदास कोळंबकर, मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, कुलाबा – राहुल नार्वेकर, पनवेल – प्रशांत ठाकूर, उरन – महेश बाल्दी, दौंड- राहुल कुल, चिंचवड – शंकर जगताप, भोसरी -महेश लांडगे, शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले, कोथरुड – चंद्रकांत पाटील, पर्वती – माधुरी मिसाळ, शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव – मोनिका राजले, राहुरी- शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड – राम शिंदे, केज – नमिता मुंदडा, निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर, औसा – अभिमन्यू पवार, तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, माण -जयकुमार गोरे, कराड दक्षिण – अतुल भोसले, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कणकवली – नितेश राणे, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, इचलकरंजी – राहुल आवाडे, मिरज- सुरेश खाडे, सांगली – सुधीर गाडगीळ.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!