संपूर्ण मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विकास केला : आमदार मेघना बोर्डीकर 

संपूर्ण मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विकास केला : आमदार मेघना बोर्डीकर 

तथागत गौतम बुद्ध व उपस्थित भिक्कु संघाचा आशीर्वाद आमदार बोर्डीकर यांच्या पाठीशी : प्रा.जोगेंद्र कवाडे

देवगावफाटा येथील आम्रवन महाविहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा थाटात

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही आपल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत आपल्याला समाजाचा नेहमीच मोठा हातभार लागलेला आहे. अशी आठवण व्यक्त केली. बापापुढे लेकीचे कौतुक ऐकले जावे. यापेक्षा मोठे भाग्य नाही, अशा भावना त्यांनी मांडल्या. शेवटची एकच राजकीय इच्छा राहिली जी मला कधी लाभली नाही. आपल्या आशीर्वादाने लेकीला मंत्री पद भेटावी हीच अपेक्षा ठेवतो, अशी भावनिक साद त्यांनी घातली.

संपूर्ण मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विकास केला आमदार मेघना बोर्डीकर 

जिंतूर /परभणी : जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी तथागताची दया, करुणा व शांती प्रत्येकांनी अंगीकारली पाहिजे
राजकारण करतांना खुद्द वडिलांनी ग्रामीण भागात भावी पिढीस डॉ.बाबासाहेबांची प्रेरणा, ऊर्जा सर्वांना भेटावी म्हणून त्यांचे पुतळे देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले. तसेच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणीची सदैव आठवण ठेवत सर्व जातीधर्माना सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. संपूर्ण जिंतूर-सेलू  मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विकास केला. तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकांच्या मनाला शांती देणारा व योग्य दिशा दाखवणारा कार्यक्रम आहे आणि हे माझ्या हातून घडले, यात मी माझी धन्यता मानते, अशा भावना आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केल्या.

सेलू तालुक्यातील आम्रवन महाविहार देवगाव फाटा येथे वर्षावास समाप्तीचे औचित्य साधून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा व धम्मदेशना कार्यक्रम मोठ्या थाटात झाला. यावेळी आमदार बोर्डीकर बोलत होत्या. या कार्यक्रमास जिंतूर सेलू तालुक्यातील भीम अनुयायाची अलोट गर्दी उपस्थित होती. याप्रसंगी लॉंग मोर्चाचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, तथागत गौतम बुद्ध व उपस्थित भिक्कु संघाचा आशीर्वाद कायम आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पाठीशी प्रत्येक कार्यात भरभरून राहील.

कार्यक्रमास भदंत शरणानंद महाथेरो, भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत संघरत्न यांच्यासह भिक्कु संघ उपस्थित होता. सुरेश भुमरे, आत्माराम पवार, भगवान वटाणे, रवी घुगे, लक्ष्मण बुधवंत,गोविंद थिटे,रमण तोष्णीवाल,गोविंद दायमा,सुनील भोंबे,सुनील मते,कैलास खंदारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाकळे सुमेध सूर्यवंशी,गुणीरत्न वाकोडे,विजय खंदारे,संदेश भालेराव, मुकुंद काळे, प्रतिक खिल्लारे, भगवान साळवे,रवी किरण गजभारे, राहुल शिंदे, अमोल वाघ,भगवान साळवे, युवराज घनसावध व येशील व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विकास मोरे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!