आमदार बोर्डीकर, डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी भरला उमेदवारी अर्ज
दुसऱ्या दिवशी ९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल
परभणी : मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली असून दुसऱ्या दिवशी बुधवारी (२३ ऑक्टोबर ) जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकूण ९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात जिंतूर मतदारसंघातून मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी भारतीय जनता पक्षातर्फे, तर गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
९५ जिंतूर विधानसभा मतदारसंघात ६ उमेदवारांनी ६अर्ज घेतले. तर ज्ञानेश्वर देविदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पार्टी), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. ९६ परभणी विधानसभा मतदारसंघात २५ उमेदवारांनी ४६ अर्ज घेतले. ९७ गंगाखेड विधानसभा मतदारसंघा ३२ उमेदवारांनी ५०अर्ज घेतले. तर रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. ९८ पाथरी विधानसभा मतदारसंघात २० उमेदवारांनी ४८ अर्ज घेतले तर भास्कर रामकिसन बेदरे (अपक्ष) व त्रिंबक देविदास पवार (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
पूर्ण…