परभणीत निवडणूक निरीक्षकांनी घेतली खर्च आढावा बैठक

परभणीत निवडणूक निरीक्षकांनी घेतली खर्च आढावा बैठक

परभणी : विधानसभा निवडणूक निरीक्षक (खर्च) राहूल मिश्रा यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीशी संबंधित खर्च विषयक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा कोषागार अधिकारी निळंकठ पाचंगे आदींसह निवडणूक खर्च संबंधी नियुक्त अधिकारी व सहायक अधिकारी, जीएसटीचे अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघांकरीता राहूल मिश्रा (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल प्रारंभी स्वागत करण्यात आले.

श्री.मिश्रा सूचना करतांना म्हणाले की, निवडणुकीच्या कालावधीत वाहनातून अवैधरित्या होणारी दारु, रोख रक्कम यांच्या वाहतुकीवर निगराणी पथकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाई करावी. प्रत्येक बाबींचे व्यवस्थित शुटींग घ्यावे. खर्च विषयक सर्व बाबींची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचित केले. जिल्हाधिकारी श्री.गावडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.परदेशी यांनीनिवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. प्रारंभी जिल्हा कोषागार अधिकारी श्री.पाचंगे यांनी निवडणुकीच्या खर्चाशी संबंधीत बाबी व नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!