सेलूमध्ये गीता परिवारची विभागीय बैठक  

सेलूमध्ये गीता परिवारची विभागीय बैठक  

सेलू/ परभणी : सेलू शहरातील बाहेती मंगल कार्यालयात गीता परिवारची मराठवाडा विभागीय बैठक मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
बैठकीस मराठवाडा विभागाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, सचिव संगीता तिवारी, माजी अध्यक्ष डॉ.राजकमार लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी स्वामीजींनी मार्गदर्शन केले. बैठकीत भविष्यातील कार्य, वाटचाली संदर्भात विचारविमर्श करण्यात आला. बाल संस्कारच्या माध्यमातून युवा मन घडविण्याचा, भगवद्गीता ज्ञान आणि शिकवणीचा प्रचार, प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. मराठवाडा विभागातील शंभरहून अधिक सदस्य बैठकीत सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!