विधानसभा निवडणूक : प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचारी यांच्या विरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येणार

विधानसभा निवडणूक : प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचारी यांच्या विरूद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येणार

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दोन दिवशीय प्रशिक्षणाला परभणीत सुरूवात 

परभणी : विधानसभा सावत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण दिनांक 26/10/2024 व 27/10/2024 रोजी ऑडीटोरीय हॉल वसंतराव नाईक कृषी विदयापीठ परभणी येथे दोन सत्रामध्ये आयोजीत करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी प्रथम सत्रमाध्ये एकूण 560 अधिकारी / कर्मचारी यांचे पैकी 492 अिधकारी / कर्मचारी हजर असुन 68 कर्मचारी गैरहजर होते. तसेच दुपार सत्रामध्ये एकूण 484 अधिकारी / कर्मचारी यांचे पैकी 438 अधिकारी / कर्मचारी हजर असुन 49 कर्मचारी गैरहजर होते. सदर प्रशिक्षणास उपस्थित सर्व नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांना दत्तू बाळू शेवाळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच संदीप राजपूरे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार परभणी यांनी यथोचित मार्गदर्शन केले.

तसेच सर्व नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मास्टर ट्रेनर श्री काचगुंडे यांनी EVM व VVPAT मतदान यंत्र सिल करण्याबाबत मागदर्शन केले व त्यांचे हॅन्डऑन प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी / कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांचे विरुध्द निवडणूक विषयक शासकीय कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी लोप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 (ब) अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याबाबत मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

सर्व नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य अचूक पार पाडावे. सदर प्रकरणी कुठलीही टाळाटाळ करण्यात येवू नये, असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले. सदर प्रशिक्षणास श्रीमती आम्रपाली कासोदकर सा.नि.नि.अ. तथा तहसिलदार सामान्य, उमाजी बोथीकर सा.नि.नि.अ. तथा तहसिलदार महसुल, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड ना.त.उ.वि.अ.का. परभणी, एम.ए.क्षीरसागर ना.त.म. 1, गणेश चव्हाण ना.त.म., श्रीमती अनिता वडवळकर ना.त. निवडणूक,  विष्णू पकवाने ना.त.सं.गा.यो. ग्रामीण, दिपक नागरगोजे पुरवठा निरिक्षण अधिकारी व नोडल अधिकारी sveep  गणेश शिंदे हे उपस्थित होते. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभाग त उपविभागीय अधिकारी कार्यालय, परभणी व तहसील कार्यालय परभणी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!