काँग्रेस, शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर

काँग्रेस, शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर

काँग्रेसकडून गोरंट्याल, देशमुख, साळुंखे : काँग्रेसने शनिवारी राज्यातील २३ मतदारसंघांमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. जालन्यातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पूर्व मधुकर देशमुख आणि निलंगा (जि. लातूर)  अभयकुमार साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसने यादी जाहीर केली. त्यात नांदेड दक्षिण मोहनराव हंबर्डे, देगलूर – निवृत्तीराव कांबळे, मुखेड हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, तुळजापूर – धीरज अप्पासाहेब कदम पाटील आदींचा समावेश आहे

प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी राज्यातील २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केले. शनिवारच्या यादीत गंगापूरमधून (जि. छत्रपती संभाजीनगर), सतीश चव्हाण, परांडा (जि. धाराशीव) राहुल मोटे व बीडमधून संदीप क्षीरसागर यांच्या नावांचा समावेश आहे.

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून (छत्रपती संभाजीनगर पूर्व) भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत.एमआयएमच्या उमेदवाराबद्दल मात्र सस्पेन्स कायम आहे. रविवारी सायंकाळ पर्यंत हा सस्पेन्स संपुष्टात येईल असे मानले जात आहे. महायुतीमध्ये पूर्व मतदारसंघ भाजपला सुटला असून, भाजपने मंत्री अतुल सावे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सावे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाने एम. के. देशमुख यांना पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा शनिवारी (२६ ऑक्टोबर) करण्यात आली.

या मतदारसंघातून एमआयएम पक्षाचा देखील उमेदवार असेल अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. परंतु, या पक्षाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाही. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमने माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी दिली आहे. पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांबद्दलचा सस्पेन्स एमआयएमने कायम ठेवला आहे. एमआयएम शिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असतील याबद्दलही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!