विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

पहिल्याच प्रशिक्षणाला १२२ जणांची दांडी, अधिकाऱ्यांनी घेतले मतदान यंत्राचे हॅन्डस्ऑन प्रशिक्षण 

विधानसभा निवडणूक : जिंतूरमध्ये मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

प्रशिक्षणास अनुपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांचे विरुध्द निवडणूक विषयक कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ (ब) अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडावे. कुठल्याही कामांमध्ये टाळाटाळ होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. – प्रवीण फुलारी, निवडणूक निर्णय अधिकारी, ९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघ

सेलू/परभणी : विधानसभा सावत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ९५- जिंतूर विधानसभा मतदारसंघातील नियुक्त जिंतूर, सेलू तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष, इतर मतदान अधिकारी आणि महिला मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी, २७ ऑक्टोबर जिंतूर येथील औंढा रोडवरील गायत्री लॉन्स येथे दोन सत्रात उत्साहात पार पडले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सेलूचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूरचे तहसीलदार राजेश सरवदे, सेलूचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, नायब तहसीलदार (निवडणूक) सुग्रीव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री.फुलारी, श्री.सरवदे, डॉ.मगर यांनी या वेळी सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राध्यक्ष तसेच अधिकारी यांची निवडणूक विषयक कार्यपद्धती त्यांनी स्पष्ट केली. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रिया, यंत्र सिल करणे यासह अनुषंगिक कामांबाबत मास्टर ट्रेनर खताळ यांनी मागदर्शन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी मास्टर ट्रेनर्सकडून मतदान यंत्रांचे हॅन्डस्ऑन प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, सहायक श्री.सरवदे, डॉ.मगर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार (निवडणूक) सुग्रीव मुंडे, शितल कच्छवे, अव्वल कारकून हरिष टाक, मास्टर ट्रेनर खताळ, मयूर जोशी, तंत्रज्ञ श्री.जोशी यांच्यासह सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिंतूर, सेलू तहसील आणि महसूल कर्मचारी व मास्टर ट्रेनर यांनी परिश्रम घेतले.

पहिल्याच प्रशिक्षणाला १२२ जणांची दांडी

९५ जिंतूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत जिंतूर व सेलू तालुक्यातील एकूण १८४४ पुरूष, महिला तसेच दिव्यांग मतदान अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी पहिल्याच प्रशिक्षणाच्या प्रथम सत्रामध्ये एकूण नियुक्त १०८७ पैकी १००६ मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, ८१ अनुपस्थित होते; तसेच दुपार सत्रामध्ये एकूण ७५७ पैकी ७१६ उपस्थित, तर ४१ अनुपस्थित होते. तब्बल १२२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पहिल्याच प्रशिक्षणाला दांडी मारली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!