आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिंतूरमध्ये रॅलीव्दारे जोरदार शक्ती प्रदर्शन

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिंतूर/ परभणी :  जिंतूर-सेलू  विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सोमवारी, २८ ऑक्टोबररोजी भव्य शक्तीप्रदर्शन आणि रॅलीव्दारे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याकडे  दाखल केला. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. नागरिकांच्या संपूर्ण विश्वासाने आणि प्रचंड पाठिंब्याने महायुतीच्या उमेदवाराला एक भक्कम बळ मिळाले आहे. जनसामान्यांचे कल्याण आणि विकासाचे वचन पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा सज्ज आहे, आपण मतदानरूपी आशिर्वाद पाठीशी ठेवून पुन्हा एकदा विकास करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार बोर्डीकर यांनी रॅलीला संबोधित करतांना केले.

या वेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,गंगाधर बोर्डीकर,भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, सुरेश भुमरे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, संदीप लहाने, राधाजी शेळके,डॉ.पंडित दराडे, सेलू तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, डॉ.संजय रोडगे, गोविंद थिटे, लक्ष्मण बुधवंत, वसंतराव शिंदे, दत्तराव महाराज सोनेकर, विजयकुमार वटाणे,विशाल देशमुख,शरद मस्के,रवींद्र डासाळकर,दिनकर वाघ,,सुंदर गाडेकर,राजेंद्र थिटे,सुरेश मामा खिस्ते,प्रमोद चव्हाण,आत्माराम पवार,मुन्ना पारवे,श्याम पवार,गणेश काटकर, सुनील भोम्बे, गोपाळ रोकडे, प्रदीप चव्हाण, प्रदीप चौधरी,भगवान देशमुख,रामराव हुलगुंडे,सुधाकर कुकडे,सुनील घुगे,किशोर जाधव,दत्ता कटारे,भगवानराव वटाणे, एड.सुनील मते,भानुदास घुगे,सुधाकर जाधव,जगदीश घुगे,रामराव घुगे,गजानन वराड,गजानन घुगे,रवी घुगे,विजय वाकळे, एड. कुमार घनसावंत,भानुदास वाळके, प्रल्हाद महाराज घोगरे,सुमेध सूर्यवंशी, गजानन चव्हाण,कैलास खंदारे,रमेश ढवळे, सुंदरराव चव्हाण,पांडुरंग आडे,विकास जाधव,संतोष राठोड,संगीता जाधव,पुनम तमशेटे,उत्तम जाधव,अशोक घुगे,श्रीरंग राठोड,अशोक बुधवंत,फिरोज भाई,रहमान भाई,मतीन तांबोळी,विलास भंडारे,गणेश कुरे,संदीप लकडे,यशवंत चौधरी,शिवाजी काळे, हमीद खान पठाण,इंद्रजीत घाटूळ, प्रदीप वाघीकर,भगवान राव देशमुख ,संतोष देशमुख,रमण तोषनीवाल,गोविंद दायमा,नागेश तडकसे,पापा कांगने,सचिन देवकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!