शासकीय, निमशासकीय कार्यालये 31 ऑक्टोबर रोजी सुरु राहणार
स्थानिक सुटी रद्द; 7 डिसेंबर रोजी सुटी जाहीर
परभणी, दि.28 : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षातील तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. दि. 26 डिसेंबर, 2023 च्या अधिसुचनेनुसार 31 ऑक्टोबर, 2024 रोजीची दिपावलीची (नरक चतुर्दशी) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याऐवजी दि. 4 जानेवारी, 2024 च्या सुधारित अधिसूचनेनुसार दि.7 डिसेंबर, 2024 रोजीची चंपाषष्ठीची सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार दि. 31 ऑक्टोबर, 2024 रोजी जिल्ह्यातील शासनाची सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये नियमितपणे सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे. सदर आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाहीत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.