विधानसभा निवडणूक : परभणीमध्ये २३३२ निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
परभणी : विधानसभा सावत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ९६ परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रथम प्रशिक्षण २६ व २७ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या सभागृहात दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. नियुक्त एकूण २५६९ पैकी उपस्थित २३३२ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. २३८ कर्मचारी अनुपस्थित होते.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू बाळू शेवाळे, सहायक निवडणूक अधिकारीसंदीप राजपूरे, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाडी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मास्टर ट्रेनर श्री काचगुंडे व त्यांच्या टिमने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्र सिल करण्याबाबत मागदर्शन केले व त्यांचे हॅन्डऑन प्रशिक्षण घेण्यात आले.
९६ परभणी मतदार संघाअंतर्गत महिलांचे (सखी बुथ) मतदान केंद्र ९६/२८७ गांधी विद्यालय खोली क्रमांक १ एकता नगर परभणी, दिव्यांग मतदान केंद्र ९६/१५० मराठवाडा हायस्कूल शिवाजी नगर खोली क्रमांक १ परभणी, युवा मतदारांसाठी मतदान केंद्र ९६/२७० बाल विद्या मंदीर खोली क्रमांक १ वैभव नगर परभणी व मॉडेल मतदान केंद्र ९६/२४४ ज्ञानोपासक महाविदयालय जिंतूर रोड खोली क्रमांक १ परभणी हे असल्याबाबत माहिती सांगण्यात आली.
सदर प्रशिक्षणास पहिल्या दिवशी २६ ऑक्टोबररोजी १०४४ पैकी ९३० हजर होते, तर ११७ कर्मचारी गैरहजर होते. २७ ऑक्टोबर रोजी १५२५ पैकी १४०२ हजर होते. १२१ कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर अधिकारी, कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांचे विरुध्द निवडणूक विषयक शासकीय कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य अचुक पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले. प्रशिक्षणास श्रीमती आम्रपाली कासोदकर, उमाजी बोथीकर, अनिकेत पालेपवाड, एम.ए.क्षीरसागर, गणेश चव्हाण, अनिता वडवळक, विष्णू पकवाने, दिपक नागरगोजे, नोडल अधिकारी गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती. होते. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.