विधानसभा निवडणूक : द्वितीय सरमिसळ प्रक्रिया शुक्रवारी
उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन
परभणी, दि.७ : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दि. 8 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजता मतदान यंत्राची (ईव्हीएम-व्हीव्हीपॅट) द्वितीय सरमिसळ (Second Randomization) जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांच्या, तसेच मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या समक्ष होणार आहे. या द्वितीय सरमिसळ (Second Randomization) साठी उपस्थित राहण्याबाबत सर्व उमेदवारांना कळविण्यात आलेले असून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयक सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्याचप्रमाणे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) प्रत्यक्ष पाहण्यासाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केली आहे. या तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्यामध्ये विधानसभेसाठी दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये 95-जिंतूर, 96-परभणी, 97-गंगाखेड आणि 98-पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 95-विधानरसभा मतदारसंघामध्ये एकूण 17 उमेदवार, 96- परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 15 उमेदवार, 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार आणि 98-पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 14 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून यानुषंगाने 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी राखीवसह सी.यू. 525, बी.यू. 963 आणि व्हीव्हीपॅट 569, 96-परभणी विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी राखीवसह सी.यू. 405, बी.यू 405 आणि व्हीव्हीपॅट 439, 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी राखीवसह सी.यू. 518, बी.यू 518 आणि व्हीव्हीपॅट 561 आणि 98-पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी राखीवसह सी.यू. 498, बी.यू 498 आणि व्हीव्हीपॅट 539 देण्यात आलेले आहेत.