चर्चेतील बातमी : सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा विजय भांबळे यांना पाठिंबा
बोराडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह बोराडे परिवारातील सदस्यांची उपस्थिती
विधानसभा निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि मित्रमंडळाने दिलेली साथ अत्यंत मोलाची असून याची योग्य ती परतफेड निश्चितपणे करणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांनी या वेळी बोलतांना दिली.
सेलू : जिंतूर,सेलू विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजय माणिकराव भांबळे यांना सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि मित्रमंडळाने शुक्रवारी, (८ नोव्हेंबर) बोराडे यांच्या निवास्थानी आयोजित समर्थकांच्या बैठकीत जाहीर पाठिंबा दिला आहे.
या वेळी उमेदवार विजय भांबळे, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, विनायक पावडे, प्रमोदराव भांबळे, प्रेक्षाताई भांबळे, बाळासाहेब भांबळे, अजय चौधरी, अशोकराव चौधरी, कृष्णा देशमुख, विनोद राठोड, सुधाकर रोकडे, मनोज मते, बोराडे परिवारातील जेष्ठ सदस्य अंकुशआबा बोराडे, नामदेवराव बोराडे, भरतनाना बोराडे, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मुकेश बोराडे, साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, माजी नगरसेवक मिलिंद सावंत, वहिदभाई अन्सारी, गौतम धापसे, बबन गायकवाड, रमेश दौड, सचिन कोरडे, बालाजी सरकाळे, राजेंद्र पवार झोडगावकर, व्यंकटबापू चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, सतीश जाधव, आयुबभाई, कासीमभाई आदींसह समर्थंकांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सेलू येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता उमेदवार भांबळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. सभा संपल्यानंतर उमेदवार विजय भांबळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सायंकाळी बोराडे यांच्या निवासस्थानी गर्दी जमली होती. या वेळी आयोजित एका कार्यक्रमात बोराडे कुटुंबियांनी श्री.भांबळे यांचे स्वागत करून पाठिंबा जाहीर केला. यामुळे जिंतूर, सेलू विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.