Cotton Market Selu : महेश खाजगी बाजारची कापूस खरेदी सुरू

Cotton Market Selu : महेश खाजगी बाजारची कापूस खरेदी सुरू

सेलूत पहिल्याच दिवशी एक हजार क्विंटल खरेदी

सेलू/परभणी : कापूस बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू शहरातील पहिल्या महेश खाजगी बाजार समितीमध्ये गतवर्षी सव्वा दोन लाख क्विंटलवर कापूस खरेदी झाली होती.समितीच्या या वर्षीच्या कापूस खरेदी हंगामाचा शुभारंभ गुरूवारी (१४ नोव्हेेबर) जेष्ठ व्यापारी सुरेंद्र तोष्णीवाल यांच्याहस्ते झाला.

पहिल्याच दिवशी खरेदीला चांगला प्रतिसाद राहिला. एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. रवळगाव रस्त्यावरील बाजार समितीच्या यार्डात भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) आणि परवानाधारक जिनिंग चालक, खरेदीदार व्यापारी यांनी लिलावाव्दारे कापूस खरेदी केली. क्विंटलला जास्तीत जास्त ७५२१ रूपये, कमीत कमी ७००० रूपये, तर सर्वसाधारण ७१२५ रूपये भाव  मिळाला. सभापती विपिन सीतारम मंत्री, सीसीआयचे नितीन भरणे, व्यापारी ब्रिजगोपाल काबरा, रामेश्वर राठी, अविनाश बिहाणी, नभाराम पवार, श्री.गुप्ता, निर्मलकुमार जैन, सचिव शामराव चौधरी आदींसह शेतकरी बांधवांची होती. बाजार समितीमध्ये गुरूवार ते शनिवार कापूस खरेदी सुरू राहणार आहे. सीसीआयची खरेदी शासकीय सुट्टी, शनिवार व रविवारही बंद राहील, असे सभापती विपीन मंत्री यांनी सांगितले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!