कॅरम स्पर्धेसाठी ‘रायरेश्वर’च्या खेळाडूंची निवड
परभणी : तालुक्यातील धर्मापुरी पाटी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी हिंगोली येथे आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून, श्वेता खवले,अनिकेत झुंगरे, सार्थक शिंदे, पार्थ महामुने या चार खेळाडूंची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या.यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव शितल सोनटक्के व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.