प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये राज्यस्तरीय वुशु स्पर्धेचे आयोजन

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये राज्यस्तरीय वुशु स्पर्धेचे आयोजन

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एल.के आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल व ऑल महाराष्ट्र वूशु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय 21 वी सब ज्युनिअर व 22 ज्युनिअर /युथ मुले मुली वूशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सुमारे 900 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता जिंतुर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य वूशू असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस झंडे, महासचिव एस.एस.कटके, परभणी जिल्हा सचिव गणेश कुटे उपस्थित राहणार आहेत. या क्रीडा स्पर्धेसाठी सेलू शहरातील तसेच परिसरातील विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  तथा वूशू असोसिएशन परभणी जिल्हाध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!