परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर
जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, परभणीतून डॉ.राहुल पाटील, गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे , पाथरीतून राजेश विटेकर विजयी
परभणी, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत परभणी जिल्ह्यातील 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (पक्ष-भारतीय जनता पार्टी), 96-परभणी विधानसभा मतदारसंघातून डॉ.राहूल वेदप्रकाश पाटील (पक्ष-शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून गुट्टे रत्नाकर माणिकराव (पक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष), 98-पाथरी विधानसभा मतदारसंघातून राजेश उत्तमराव विटेकर (पक्ष-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी) हे विजयी झाले. २० नोव्हेंबररोजी मतदान प्रक्रिया पार पडली. २३ नोव्हेंबररोजी मतमोजणीनंतर अधिकृत निकाल त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांचे नाव, पक्ष व त्यांना मिळालेली मतांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
95-जिंतूर विधानसभा मतदारसंघ- अनिल बन्सी चव्हाण (बहुजन समाज पार्टी)-692, बोर्डीकर मेघना दिपक साकोरे (भारतीय जनता पार्टी)-113432, भांबळे विजय माणिकराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)-108916, नागरे सुरेश कुंडलिकराव (वंचित बहुजन आघाडी)-56474, डॉ. प्रभाकर बुधवंत (राष्ट्रीय समाज पक्ष)-1091, रमेश भिमराव राठोड (जय सेवालाल बहुजन विकास पार्टी)-461, शेख सलिम शेख इब्राहिम (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत)-370, सुभाष किसन वाव्हळे (बहुजन रिपब्लीकन सोशलिस्ट पार्टी)-279, अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष)-223, अतुल निवृत्ती अंभोरे (अपक्ष)-202, अमोल लक्ष्मण डंबाळे (अपक्ष)-539, राजीव किशनराव पंचांगे (अपक्ष)-422, विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष)-1035, विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष)-7430, सय्यद रियाज गफुर सय्यद (अपक्ष)-663, सुखदेव उद्धव भांबळे (अपक्ष)-714, ज्ञानदेव नारायणराव दाभाडे (अपक्ष)-164, नोटा-1335.
96-परभणी विधानसभा मतदारसंघ- आनंद शेषराव भरोसे (शिवसेना)-92587, डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)-126803, श्रीनिवास सुरेशचंद्र लाहोटी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-986, ॲड.इम्तियाज खान (ऑल इंडिया मजलिस-ई-इत्तेहादूल मुस्लीमीन)-764, चकोर महामुनी सावित्री (राष्ट्रीय समाज पक्ष)-1779, विजय अदिनाथराव वरवंटे (बुलंद भारत पार्टी)-526, ॲड. अफजल बेग सहाब (अपक्ष)-146, गोविंद भैया रामराव देशमुख पेडगावकर (अपक्ष)-110, चत्रगुण अवचार पाटील नेते (अपक्ष)-178, दिपक बलराम शिंदे (अपक्ष)-222, नासेर शरीफ शेख (अपक्ष)-5442, अ.पाशा.अ.गफार कुरेशी (अपक्ष)-113, फारुख खान रौफ खान (अपक्ष)-228, मौहम्मद गौस झैन (अपक्ष)-1773, सुर्यकांत रोहिदास मोगल (अपक्ष)-769, नोटा-1355.
97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघ- कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे)-115252, देशमुख रुपेश मनोहरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-2479, गुट्टे रत्नाकर माणिकराव (राष्ट्रीय समाज पक्ष)-141544, माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी)-1203, विठ्ठल जिवनाजी रबदाडे (जनहित लोकशाही पार्टी)-2463, सिताराम घनदाट (मामा)(वंचित बहुजन आघाडी)-43026, अलका विठ्ठल साखरे (अपक्ष)-617, नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष)-463, भोसले विष्णुदास शिवाजी (अपक्ष)-336, विठ्ठल सोपानराव निरस (अपक्ष)-496, विशाल बालाजीराव कदम (अपक्ष)-1470, ॲड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष)-496, नोटा-1470.
98-पाथरी विधानसभा मतदारसंघ- राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी)-83767, वरपुडकर सुरेश अंबादासराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)- 70523, खान सईद (गब्बर)(राष्ट्रीय समाज पक्ष)-54647, जाधव गणेशनाथ आदिनाथ (स्वराज्य शक्ती सेना)-687, इंजि. सुरेश किशनराव फड (वंचित बहुजन आघाडी)-5415, त्रिंबक देविदास पवार (ऑल इंडिया हिंदूस्थान काँग्रेस पार्टी)-715, अब्दुल खान लतिफ खान दुर्रानी (बाबाजानी)(अपक्ष)-48257, अर्जुन ज्ञानोबा भिसे (अपक्ष)-373, किशोरकुमार प्रकाश शिंदे (अपक्ष)-1234, चंद्रसिंग एकनाथ नाईक (अपक्ष)-702, माधवराव तुकाराम फड (अपक्ष)-10544, राजेश बालासाहेब पाटील (अपक्ष)-1019, शिवाजी देवजी कांबळे (अपक्ष)-1183, समाधान अश्रोबा साळवे (अपक्ष)-722, नोटा-1657.