डॉ.संजय रोडगे यांना स्टार एज्युकेशन अवॉर्ड

डॉ.संजय रोडगे यांना स्टार एज्युकेशन अवॉर्ड

ईएसएफईकडून मुंबईत सन्मान

सेलू/परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांना शाळेतील अभिनव उपक्रमांसाठी ईएसएफईकडून स्टार एज्युकेशन अवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित एका विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. डॉ.रोडगे यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नवीन उपक्रम राबवले आहेत. यात रोबोटिक्स लॅब, मोबाईल एक्सपेरिमेंटल लॅब, विद्यार्थी गेमिंग झोन आणि इंग्लिश लँगवेज लॅब यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयांबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे. श्रीराम प्रतिष्ठान ही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवली जातात. पुरस्काराबद्दल डॉ.रोडगे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!