पराभवाने खचून जाऊ नका : खासदार शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेलच्या पदाधिकाऱ्यांना दिला धीर
परभणी : संघटन मजबूत करण्यावर भर द्या. विधानसभेतील पराभवाने खचून जाऊ नका, निराशा होऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिक्षक सेलच्या पदाधिकाऱ्यांना धीर दिला आहे.
खासदार शरदचंद्र पवार यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार शिक्षक सेलचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी बुधवारी, २७ नोव्हेंबर रोजी श्री पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यावेळी प्रा.किरण सोनटक्के यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या निसटता पराभवाविषयी कारणमीमांसा केली. या वेळी स्वाराती मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या सिनेट सदस्य तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सदस्य प्रा.शीतल सोनटक्के यांची उपस्थिती होती. मराठवाड्यात राष्ट्रवादी शिक्षक सेलचे संघटन अधिक विस्तारण्यात येणार असल्याचे प्रा.सोनटक्के यांनी या वेळी सांगितले.