वालूर येथे ८७ जणांचे रक्तदान
हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त उपक्रम
सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथे बुधवारी सकाळी ११ वाजता हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन वालूर येथील टिपू सुलतान मंच शाखेच्या वतीने करण्यात आले होते. शिबिरामध्ये ८७ जणांनी रक्तदान केले. या प्रसंगी हाजी इस्माईल सेठ, हाजी मो.हनिफ कुरेशी, अमोल कलाल, सयद जलाल, शैलेश तोष्णीवाल, अजहर पठाण यांची उपस्थित होती. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी यांनी रक्तसंकलानासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन शेख इरफान जमीनदार यांनी केले. शिबिरासाठी वालूर शाखाध्यक्ष मकबूल भाई, उपाध्यक्ष शेख मोहसिन, कोषाध्यक्ष अयाज कुरैशी, उस्मान पठाण, शेख मुस्ताक, शाकेर जागिरदार, इरफान जमीनदार सल्लागार, शेख अबु बकर, आजीम शेख. अदनान सयद, रिजवान पठाण, अजु पठाण, यासीन जरगर, सलमान पठाण आदींनी पुढाकार घेतला.