तेजज्ञान फाऊंडेशन रजत जयंती : सेलूमध्ये आज ध्यान महोत्सव
तेजगुरू सरश्री यांची विशेष वाणी, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती
सेलू : आपल्या जीवनात अमूल्य असे ज्ञान देऊन सकारात्मक परिवर्तन करण्याच्या उद्देशाने कार्यरत तेजज्ञान फाऊंडेशनला २६ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने रविवारी, एक डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भव्य रजत जयंती ध्यान महोत्सवाचे सेलू येथे आयोजन करण्यात आले आहे.
ध्यान ज्ञान केंद्र, गेना कॉम्प्लेक्स, गोपी कलेक्शनच्या समोर, बाबासाहेब मंदिर रोड, सेलू येथे हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव तथा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महोत्सवानिमित्त तेजगुरू सरश्री यांची विशेष वाणी ऐकण्यासाठी जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेलू येथील तेजज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.