शपथविधी सोहळ्याचा भाजपकडून सेलूत जल्लोष
सेलू/परभणी : राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींसह मान्यवरांच्या साक्षीने गुरुवारी मुंबई येथील आझाद मैदान येथे पार पडला. या शपथविधी सोहळ्याचा जल्लोष सेलू शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय परिसरात फटाके वाजवून तसेच ढोल ताशाच्या गजरात, पेढे भरवून साजरा करण्यात आला. या वेळी अशोक खताळ, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, गणेश काटकर, पराग गोळेगावकर, शिवाजी खेडकर, डॉ.गणेश थोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी येथील गांधीपार्कात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विलास चांदवडकर यांच्या नेतृत्वाखालील गुरुवारी सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सुभाष डहाळे, अमोल डहाळे, सुरेंद्र टाक, अमोल देशपांडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.