विद्यार्थ्यांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा
साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेचा उपक्रम, स्पर्धेचे पाचवे वर्ष
जिल्हाफेरी १४, तर विभागीयफेरी २४ डिसेंबरला
सेलू/परभणी : पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त हेलस कथामाला शाखा आणि जालना येथील मानस फाऊंडेशनच्या सहकार्याने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून जिल्हाफेरी १४ तर मराठवाडा विभागीय फेरी ही २४ डिसेंबरला होईल, अशी माहिती हेलस साने गुरुजी कथामाला शाखेच्या अध्यक्षा कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी दिली आहे.
स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसच्या वतीने (ता.मंठा जि.जालना) अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. स्पर्धेसाठी कुठलेही शुल्क नसून मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभाग घेवू शकतात.
कथाकथन स्पर्धा बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी तसेच किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी अशी आहे. कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे. कथा आठ ते दहा मिनिटांची असावी. कथाकथन स्पर्धेत जिल्हास्तर : प्रथम , व्दितीय व तृतीय पारितोषिक : प्रमाणपत्र व ग्रंथ भेट, विभागीय स्तरावर पारितोषिक : बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख : ११ डिसेंबर २०२४, बुधवार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक : १४ डिसेंबर २०२४, शनिवार होईल. सहभागासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे https://forms.gle/AjUgULXkpo3m4fxK6
विभागस्तरीय स्पर्धा दिनांक : २४ डिसेंबर २०२४, मंगळवारी घेण्यात येईल. कथाकथन स्पर्धा जिल्हा संयोजकात जालना : आर.आर.जोशी, संदिप इंगोले, पवन कुलकर्णी, परभणी : डॉ.काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत, छत्रपती संभाजीनगर : सुनील साबळे, कुंजीलाल कुमावत तर नांदेड : व्यंकटेश चौधरी, विलास कोळनूरकर, पद्माकर कुलकर्णी, लातूर : राम तत्तापुरे, चंद्रशेखर कळसे, बीड : वाय.जी.बेंबडे, बी.एल.चाटे, हिंगोली : प्रा.डॉ.नामदेव दळवी, धाराशिव : कुंडलीक पवार, रवि गोडसे जिल्हा यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे; तसेच सहभागासाठी ९४२००३६९३५, ९४२१४७४३४०, ९४०४५३६७६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर, प्रा.डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, ईश्वरदास मोताळे यांनी केले आहे.