हेरंब कुलकर्णी यांचे सेलूमध्ये व्याख्यान

हेरंब कुलकर्णी यांचे सेलूमध्ये व्याख्यान

श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला व शिक्षण विभागाचा उपक्रम, १८ डिसेंबररोजी साई नाट्यगृहात कार्यक्रम

सेलू/परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला व शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘ शिक्षकांसाठी साने गुरुजी ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सेलू येथील साई नाट्यगृहात बुधवारी, १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम आहे. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. व्याख्यानास शिक्षक, शिक्षिका, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरुजी, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, सहसंयोजक प्रा.सुभाष बिरादार व पंचायत समिती शिक्षण विभागाने केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!