न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात

सेलू/परभणी : येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा मंगळवारी, १७ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष तथा जिपचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे होते. या वेळी लता गिल्डा, ब्रिजभूषण काबरा, ॲड फोफसे,मुख्याध्यापक बी ए नाईकनवरे,पर्यवेक्षक धनंजय भागवत, एस.टी.नागरे, डी.सी.सोळंके, जी. के. तोटेवाड, पालक प्रतिनिधी बाबासाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायकराव पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. श्रीमती लता गिल्डा यांनी प्रफुल्ल गिल्डा यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांंना २५ डझन वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नाईकनवरे यांनी केले. पर्यवेक्षक धनंजय भागवत, एस.टी.नागरे यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी त्रिरत्न सावंत, मयुरी हजारे तर बाबासाहेब कांबळे, संघमित्रा ढाले पालकानी आपले मनोगत व्यक्त केले. नुकत्याच गेवराई येथे संपन्न झालेल्या कै.विनायकराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीड़ा स्पर्धा घेण्यात आले होत्या त्यात १७ वर्षीय वयोगटातील कबड्डी, रस्सीखेच, लांबउडी आदी क्रीडाप्रकारात विद्यालयला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल क्रीड़ा शिक्षक रामेश्वर कदम व सर्व खेळाडूचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, रोटेंवाड जी.ए. तोंदूलवार जी. एस., विष्णू गजमल, अंगद मोरे, नारायण काष्टेसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोटेवाड जी. के यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सोळंके डी.सी.यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!